जि.प .प्रा. शाळा जगताप घालमे वस्ती

Monday, 22 February 2016

PPT




🔅आपण डिजिटल education विषयी माहिती घेत असताना आपण ppts हे प्रभावी माध्यम वापरतो. PPts तयार करताना बऱ्याच समस्या येतात ज्यात रंगसंगती कशी निवडावी ? निवडलेल्या घटकाच्या आशयानुरूप फॉन्ट व फॉन्ट साईझ किती ठेवावी ? आशयानुरूप स्लाईड बनवलेली आहे का ? ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला खालील वेबसाइट देतात. ह्या वेबसाइट शिक्षकाला त्याच visual design ठरवण्यास मदत करतात.

📌Slidemodel.com

📌Slidehunter.com

📌FPPT.com

📊ह्या साईट वरील readymade टेम्प्लेट तुम्ही पॉवरपॉइंट प्रेसेंटशन ऑफिस इंप्रेस किंवा गूगल slides मधे वापरू शकता.

🔏Slidehunter.com ह्या साईट मधे प्रेसेंटशन्स चे असंख्य नमुने दिसतात. ते नमुने डाउनलोड करून आपल्या ppts मध्ये इम्पोर्ट करू शकतो.गूगल slide मध्ये तुम्ही पूर्ण ppt इम्पोर्ट करु शकता त्याबरोबरच एखादी आवडलेली slide लेआऊट सुद्धा फक्त घेऊ शकता. आशयानुसार मोडिफिकेशन करणेही शक्य होते.

🔏FPPT हि अजून एक सुंदर साईट आहे ज्यात असंख्य प्रकारचे ppt नमुने दिले आहेत. शिक्षकांसाठी खास designs यात दिलेले आहेत.यात वैशिष्टयानुरूप search करण्याची सुविधा आहे.रंगवैशिष्टयानुसार ppt नमुने दिले आहेत, ह्या वेबसाइट मध्ये खास शैक्षणीक विभाग दिलेला आहे ज्यात विषयवार ppt नमुने आढळतात.
 🔏Slidemodel.com एक अशी वेबसाइट आहे ज्यात प्रोफेशनल लोंकांनी बनवलेल्या ppt पाहता येतात इम्पॉर्टकरून गरजेनुरूप मोडीफाय करता येतात. रजिस्टर करून वीकली ppt मिळवू शकता.अनलिमिटेड वापरा करता अत्यल्प दरात मेम्बरशीप सुद्धा आहे.

Thursday, 21 January 2016

आज दिनांक २१/०१/२०१६रोजी माननिय श्री जंजीरे साहेब (गटशिक्षण अधिकारी कर्जत), कांबळे साहेब (केंद्रप्रमुख ), गंगावणे साहेब (केंद्रप्रमुख) यांनी शाळेला भेट दिली .येताना वीटभट्टी परिसरास भेट देऊन दोन शाळाबाह्य विद्यार्थी दाखल केले. तसेच शाळा ISO करण्यासाठी आणि ज्ञानरचनावाद पद्धतीने अध्यापन करण्यासाठी मार्गदर्शन केले.तसेच प्रजासत्ताकदिन रोजी होणारे मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पाहिले